पुण्यात नातूबाग मैदानावर चिखल, तरीही आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार

सहा वाजेपर्यंत मैदान तयार होईल, कार्यकर्त्यांना विश्वास

पुणे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज सायंकाळी बाजीराव रस्त्यालगत असलेल्या नातुबाग मैदानावर होणार आहे. मात्र, बुधवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे या मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत हे मैदान कोरडे होईल की नाही याची चिंता कार्यकर्त्यांना पडली आहे. मात्र, मैदानाची साफसफाई सुरू असून आज सायंकाळी येथेच सभा होणार असल्याचे मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. याच दरम्यान मनसेची पहिली सभा आज पुण्यात होत आहे. मात्र, काल पुण्यात रात्री नऊनंतर जोरदार पाऊस झाला होता. यामुळे शुक्रवार पेठेतील नातू बागेतील मैदानावर राज ठाकरे यांच्या सभास्थळी पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. आज होणार्‍या सभेला येणार्‍या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मैदानावरील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. तर, सहा वाजेपर्यंत मैदान तयार होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies