खासदार उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट, मानले विशेष आभार

आग्रातील मुगल संग्रालयाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रालय असे नामांतर करण्यात आले असून, त्यापार्श्वभुमीवर उदयनराजेंनी भेट घेतली आहे

नवी दिल्ली । खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. आग्रा येथील संग्रहालयाला आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाव दिले आहे. त्यापार्श्वभुमीवर त्यांचे आभार मानन्यासाठी उदयराजेंनी आदित्यनाथ यांना भेटून त्यांचे आभार मानले आहे. पाच महिन्यांपुर्वी आदित्यनाथ यांनी मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उदयराजेंनी आदित्यनाथांचे कौतुक केले आहे. त्यांनी शनिवारी आग्राला जाऊन भेट घेतली.

उदयनराजे यांनी ट्विट करून यासंबंधी व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे, त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, 'आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देऊन योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.'असे ट्विट उदयनराजेंनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies