"राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही”, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला टोला.

 मुंबई | “भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल होते याला प्रत्युउत्तर देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा विश्वासाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  “देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही,” असे नाना पटोले म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies