पुण्याहून बायकोला आला न्यायला ठेवले बांधून, जिवाच्या आकांताने त्याच्या आर्त हाका

कर्जत तालुक्यातील घटना

कर्जत | देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. या संकटाने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे गावाच्या, शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. जेणेकरून संसर्ग पसरू नये. अशातच रायगड जिल्ह्यातल्या कळंब या गावाचा जावई असलेला हरी वरपे हा पुण्याहून कळंब मधील गरूडपाडा येथे बायकोला न्यायला आला. मात्र त्याला खोकला, शिंका येत असल्याने तो कोरोना बाधित असल्याची शंका आल्याने घरच्यांनी त्याला परत जायला सांगितले. मात्र तो परत जात नसल्याने त्याला घराच्या बाहेरच बांधून ठेवण्यात आले. या प्रकाराने गावकरी भयभीत झाले आहेत. तर बांधून ठेवलेले वरपे हे जिवाच्या आकांताने ओरडत आहेत. परंतु प्रशासन जागेवर न आल्याने वरपे यांचा जगण्यासाठी आर्त धावा सुरू आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातल्या कळंब येथील गरूडपाड्यात एका व्यक्तीला बांधून ठेवण्यात आले होते. तर तो व्यक्ती कोरोना संशयित असल्याचे समजत होते. मात्र एएम न्युजच्या बातमीनंतर सदर व्यक्तीची नेरळ पोलिसांनी सुटका केली असून त्याला कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करता दाखल करण्यात आले आहे. त्यात व्यक्तीची तपासणी केली असून कोरोनाची कोणतीही लक्षणे सद्यस्थितीत त्यात दिसत नसल्याची माहिती कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी निलेश यादव यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies