करमाळा । उजनी जलाशयात पकडली दोनशे किलोची मगर

उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे

करमाळा । उजनीच्या अथांग जलाशयाच्या पाण्यामध्ये सध्या मच्छिमारांना मासे सापडत नसताना मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच भिमानगर येथील उजनी धरणाजवळ भराव्यावर चक्क मगर असल्याची जलाशयात मच्छिमारी करणारे भगवान भोई मामू खानेवाले यांच्यासह इतर मच्छीमारांना दिसली. तब्बल 12 फूट लांब व 200 किलो वजनाची मगर पकडण्यात स्थानिक मच्छिमार यांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली आहे.

भराव्यावरून तिला पाण्यात जाता येत नसल्याने तिथे अडकली होती, सदर मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. ही माहिती देताच सर्वांनी मिळून या मगरीला दोरीच्या व जाळीच्या सहाय्याने पकडली व याची माहिती व अधिकाऱ्यांना दिली. वनाधिकार्‍यांनी येऊन सदर मगर आपल्या ताब्यात घेतली व पुढे नेली असे समजते.

उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे, अशा बातम्या येत होत्या. परंतु त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु आज प्रत्यक्षातच मगर सापडल्याने उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. हे लक्षात आल्याने मच्छीमारांची पाचावर धारण बसली असून उजनी जलाशयात आणखी किती मगरी असतील अशी भीती मच्छिमारात निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिमानगर येथे उजनी धरणावर भोई समाजातील महादेव नगरे,मामू भोई, शांतीलाल नगरे, नितीन सल्ले, सुरज नगरे, अशोक पतुले, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले यांनी मगर पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



AM News Developed by Kalavati Technologies