तब्बल 15 तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा,“उचलून खंडा तलवार, जय मल्हार बोला”

42 किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ, खंडेरायाच्या मर्दानी दसरा सोहळ्याची सांगता

पुणे | अखंड महाराष्ट्रचे कुलदैवत असलेल्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचे आयोजन करण्यात येते. तब्बल 15 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होतो. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर सुरु झालेला मर्दानी दसऱ्याची खंडा तलवारीचे मर्दानी खेळ संपन्न झाल्यानंतर समारोप झाला. राज्यातील लाखो भाविक मर्दानी दसऱ्यासाठी खंडेरायाच्या गडावर दाखल झाले होते. शेकडो वर्षापासून इथ चालू असलेल्या 42 किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सारेच थक्क झाले.

मल्हारी मार्तंड ! जय मल्हार ! जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रात जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला “मर्दानी दसरा” म्हणून ओंळखले जाते. खंडोबाच्या या सोहळ्यात विविध जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळे मान आहेत. अगदी मुस्लिम समाजालाही यामध्ये सेवेचा मान आहे.

पालखी सोहळा जेजुरी गडावर आल्यावर रंगते ती म्हणजे मर्दानी खेळांची स्पर्धा. 12 वर्षपासून ते 60 वर्षापर्यंत भक्त या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होतात. तब्बल 42 किलोंची असणारी एका हातात जास्तीत जास्त वेळ पेलून धरण्याची आणि दाताने उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धाच या ठिकाणी रंगते. 42 किलो वजन असनारी हा खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षपूर्वी अर्पण केली. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसरऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला कि ती उचलली जाते. अशाप्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.

शेकडो वर्षांची असेलली परंपरा जोपासत भक्तीमय वातावरणात पिवळ सोन अर्थात भंडारा उधळून फटाक्यांच्या अताशबाजीत सलग 15 तास हा मर्दानी दसरा संपन्न झाला. जेजुरी नगरीला सुवर्णनागीरचे स्वरूप प्राप्त झाले होते. या मर्दानी दसऱ्यानिमित्त “देवा तुजी सोन्याची जेजुरी”असाच प्रत्यय भाविकांना येतो.AM News Developed by Kalavati Technologies