करमाळा | युवासेनेच्या वतीने जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे.

करमाळा | करमाळा शहरातील किल्ला वेस येथे युवा सेनेच्या वतीने जय भगवान गोयल यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. गोयल यांनी लिहिलेले आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांच्या पुतळ्याचे दहन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद करमाळा येथेही पाहायला मिळाले. गोयल यांनी पुस्तकाचे नाव व फोटो मध्ये नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे असल्याचे फोटो व पुस्तकाच्या नावामध्ये भासविले आहे. त्यामुळे करमाळा युवा सेनेचे शहर युवा अध्यक्ष विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी निषेध म्हणून गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दिल्या.

यावेळी युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विशाल गायकवाड यांनी सांगितले की, सदरचा निषेध हा शिवसेना माजी आमदार नारायण आबा पाटील व जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे दैवत असून त्यांच्यासारखा दुसरा व्यक्ती या भूतलावर झाला नाही आणि होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची तुलना कोणत्याही व्यक्तीशी करू नये. मग ती व्यक्ती पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असो. त्याचे समर्थन हा महाराष्ट्र करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन हिंदूहृद्यसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली व त्यानुसारच शिवसेना युवासेना कार्य चालू असून त्यांच्या बद्दल असे काही आक्षेपार्ह आढळ्यास शिवसेना युवासेना शांत बसणार नाही. तरीही काही समाजकंटकांनी असे काही कृत्य केल्यास त्याचे होणारे परिणाम भोगायची तयारी ठेवावी त्यांना सडेतोड उत्तर द्यायला शिवसेना युवासेना समर्थ आहे.AM News Developed by Kalavati Technologies