अबब! साताऱ्यात आज 800 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून गेल्या 24 तासात 800 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

सातारा । साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज जिल्ह्यात तब्बल 800 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 22 हजार 147 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 8 हजार 483 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 582 जणांचा मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 13 हजार 82 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 53 हजार 628 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले आहे.

हेही वाचा : कोरोना अपडेट | लातूरात गेल्या 24 तासात 347 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 11 हजारांच्या पुढेAM News Developed by Kalavati Technologies