पिंपरी-चिंचवडमध्ये विजयमाला पाटील यांनी साकारली रांगोळीतून पैठणी

दहा किलो रांगोगोळीतून नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख पैठणी साकारली आणि सर्वांचं लक्ष वेधल

पुणे । आपण आतापर्यंत रांगोळीचे अनेक प्रकार बघितले असतील. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एका गृहिणीने रांगोळीतून चक्क पैठणी साकारली आहे. या अनोख्या रांगोळीची सध्या जोरदार चर्चा आहे. विजयमाला पाटील असे ही रांगोळी काढणाऱ्या गृहिणीचे नाव आहे. लहानपणापासून विजयमाला यांना रांगोळीची आवड होती. त्यांत त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी तीन दिवस राबून, दहा किलो रांगोगोळीतून नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख पैठणी साकारली आणि सर्वांचं लक्ष वेधल.

खर तर शहरी भागात मोठ्या रांगोळी काढण्यास जागा नसते. त्यामुळे विजयमाला यांनी चक्क घरातील हॉलमध्येच रांगोळी काढली. विजयमाला यांनी हॉलमध्येच रांगोळी साकारल्याने घरच्यांची मात्र अडचण झाली. सर्वांना फॅन लावणे आणि गॅलरीच्या खिडक्या उघडण्यास मज्जाव त्यांनी केला होता. हॉलमध्ये येऊ नका, व्यस्थित या अस पत्नी विजयमाला यांचं ऐकावं लागत होतं असं विजयमालाचे पती उदय यांनी हसून सांगितलं.AM News Developed by Kalavati Technologies