धनगर समाज उपोषणाचा पाचवा दिवस, तिघांची प्रकृती ढासळली

धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खालावत आहे

पंढरपूर | पंढरपूर येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. टिळक स्मारकमध्ये धनगर आरक्षण समन्वय समितीचे कार्यकर्ते उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यामधील अनेकांची प्रकृती ढासळली आहे. तीन जणांना पोलिसांनी बळजबरीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिला आहे. या कारणामुळे आता त्यांची प्रकृती जास्त बिघडण्याचे चिन्ह आहेत. एकीकडे राज्यातील पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खालावत आहे. यामुळे फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिले आहे.

धनगर समाजाचा एस.टी.मध्ये समावेश करावा. यासाठी गेल्या पाच दिवसापासून पंढरपुर मधील टिळक स्मारक मध्ये धनगर आरक्षण समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे. हे उपोषणाला नऊ धनगर बांधव बसले होते. त्यातील गंगा प्रसाद केशवराव खारुडे यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी जिल्हा उपरुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. तर सतिश झंजे, धनाजी बंडगर यांची देखील प्रकृती खालावली आहे. गेल्या पाच दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनास भेट दिली. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्र्यकडून एसटीचे प्रमाणपत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर अशी आक्रमक भूमिका धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.AM News Developed by Kalavati Technologies