संचारबंदीतही शेकडो तरुणांच रक्तदान, कोल्हापुरात रक्ताच्या तुटवड्यावर मात

हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या युवकांनी आदर्श घेण्याची गरज

कोल्हापूर | एकीकडे कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडासुद्धा जाणवत आहे. अशा परिस्थितीत गडहिंग्लजचे नगरसेवक महेश कोरी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय. कोरोना व्हायरसमुळे संचारबंदीचे नियम कडक असताना आणि एकमेकांसमोर न येण्याचे आव्हान असताना त्यावर मात करत हे शबीर आदर्श रित्या पार पडले. या शबीरासाठी रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. रक्तदानासाठी आलेले रक्तदाते प्रत्येकी 3 मीटर अंतरावर थांबून मग नंबर येईल तसे रक्तदानासाठी जात होते. अर्थात सोशल डिस्टनसिंग पाळलं गेलं होतं. संकट काळातही महाराष्ट्राच्या युवकाने जर ठरवले तर तो काहीही करू शकतो हे दाखवून दिलंय. संचारबंदी काळात रस्त्यावर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या युवकांनी जरा यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.AM News Developed by Kalavati Technologies