'रोहितदादा आले तर कोणी बिनलग्नाचं राहणार नाही', छोटा पुढारी घनश्याम दराडेची फटकेबाजी

मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरलोय - रोहित पवार

कर्जत । राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यातर्फे आयोजित युवा महोत्सवाचा एकच चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले असताना रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या युवा महोत्सवात नगरचा छोटा पुढारी घनश्याम दराडे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी युवकांनी आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीमध्ये स्वत: रोहित पवार सहभागी झाले होते.

'रोहितदादा निवडून आले तर कोणी बिनलग्नाचं राहणार नाही....'
कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिनेकलाकार आणि राज्यात छोटा पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम दराडे याने त्याच्या खास विनोदी शैलीमध्ये भाषण करताना ग्रामीण भागात युवकांचे लग्न होत नाहीत, मात्र आता रोहितदादामुळे कोणाचंही लग्न राहणार नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर सभामंडपात एकच हशा पिकला. यावेळी तरुणांच्या हाताला काम नक्की मिळणार हे रोहितदादा पवार यांचे वादळ कर्जत व जामखेड तालुक्यात आल्याचंही छोट्या पुढाऱ्याने नमूद केलं.

रोहित पवार म्हणाले की, हे छोटे पुढारी नसून छोटे कलेक्टर आहेत आणि त्यांच्या भाषणामुळे फेमस आहेत आणि सिनेक्षेत्रात प्रसिद्ध आहेत ते कष्ठामुळे. आणि हाच आदर्श युवकांनी समोर ठेवावा, प्रामाणिकपणे काम करताना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व युवकांमध्ये जाऊन काम करण्यास आवडते आणि मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.AM News Developed by Kalavati Technologies