माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींना भोवळ, पुण्यातील रुग्णालयात दाखल

78 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रविवारी रात्री बेशुद्ध झाले होते.

पुणे | भाजप नेता आणि प्रख्यात पत्रकार अरुण शौरी यांची प्रकृती बिघडली आहे. यानंतर त्यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सोमवारी याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 78 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रविवारी रात्री बेशुद्ध झाले होते. यानंतर त्यांनी येथे रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, सध्या त्यांच्या तपासणी केली जात आहे. त्यांच्या आरोग्याकडे आम्ही लक्ष ठेवत आहे. ते आता शुद्धीवर आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies