शिरूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, परिसरात भीतीचे वातावरण

गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरु आहे

पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ज्या परिसरात ती व्यक्ती  राहत होती त्या परिसरामध्ये औषध फवारणी करून निर्जंतुक केले आहे तर त्या परिसरामध्ये जाण्यास निर्बंध घातले आहेत.

 गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत त्यावर  औषध फवारणी देखील केली जात आहे. परिसरातील राहणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभागाच्यावतीने होम क्वांराटाइन चा सल्ला देखील देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या सेविका घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तींची माहिती जाणून घ्यायचा देखील प्रयत्न करत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून खबरदारीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही  याची देखील काळजी घेतली जात आहे. प्रशासनाकडून सर्वाना आव्हान केले जाते आपण देखील विनाकारण बाहेर पडू नये आणि घरात राहूनच  प्रशासनाला सहकार्य करावे.AM News Developed by Kalavati Technologies