Corona Satara : साताऱ्यात आज 716 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला 22 हजारांचा टप्पा

सध्या जिल्हयात 8 हजार 326 जणांवर उपचार सुरू असून, 599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सातारा । साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज जिल्ह्यात तब्बल 716 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 22 हजार 863 वर पोहोचला आहे. सध्या जिल्हयात 8 हजार 326 जणांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 599 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 13 हजार 937 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात रोजच कोरोनाचे शेकडो रुग्ण सापडत आहे. त्यामुळे साताराकरांच्या चिंतेत आणखीणच भर पडली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies