कोरोना अपडेट | सोलापूरात आज 300 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सध्या जिल्ह्यात 6053 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 34 हजारांच्या पार गेला आहे

सोलापूर । सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आज 300 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 34 हजार 960 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 53 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 1 हजार 202 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 27 हजार 705 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढती रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे.



AM News Developed by Kalavati Technologies