कोरोना अपडेट | सांगलीत आज 237 जणांना कोरोनाची बाधा, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

जिल्ह्यात सध्या 3764 रुग्णांवर उपचार सुरु असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 41 हजारांच्या पार गेला आहे

सांगली । सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आज जिल्ह्यात 237 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 41 हजार 994 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 1 हजार 546 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 36 हजार 774 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत कोरोनाचा हाहाकार कायम आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies