कोरोना अपडेट | सांगलीत आज 936 जणांना कोरोनाची लागण; कोरोनाग्रस्तांचा आकड्याने ओलांडला 21 हजारांचा टप्पा

सध्या जिल्ह्यात 8 हजार 950 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत 798 जणांचा मृत्यू झाला आहे

सांगली । सांगली-साताऱ्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात सांगलीत पुन्हा 936 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 21 हजार 370 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 8 हजार 950 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 798 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 11 हजार 622 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे सांगलीकराच्या चिंतेच आणखीणच भर पडली आहे.

हेही वाचा : Corona Satara : साताऱ्यात आज 716 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला 22 हजारांचा टप्पाAM News Developed by Kalavati Technologies