बारामतीनं कायम हीन वागणूक दिली, आता लढायचं, भाजप प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य

निष्ठेने वागायचं असल्यास भाजपसोबत जाण्याशीवाय पर्याय नाही - हर्षवर्धन पाटील

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील हे प्रदीर्घ काळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहिले होते. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यास अनेक भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता पार पडला.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र इंदापूरच्या जागेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघंही इंदापूरच्या जागेवर आघाडीकडून आपल्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र आपल्याला उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्ह आहेत त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

बारामतीनं कायम हीन वागणूक दिली - हर्षवर्धन पाटील
काही दिवसांपूर्वी संकल्प मेळावा घेत इथून मागे इंदापूरकरांवर खूप अन्याय झालाय. बारामतीने कायम हीनतेची वागणूक दिली; मात्र आता आपण सहन करायचं नाही तरं लढायचं, असा संकल्प पाटील यांनी केला आहे. निष्ठेने वागायचं असल्यास भाजपसोबत जाण्याखेरीज पर्याय नाही, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपवर स्तुतिसुमने उधळली. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच काँग्रेस नेते आनंदराव पाटील आणि कृपाशंकर सिंह या काँग्रेस नेत्यांचाही आजच भारतीय जनता पक्षात प्रवेश होईल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमावेळी केवळ हर्षवर्धन पाटील यांचाच पक्ष प्रवेश पार पडला. पक्षप्रवेशानंतर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "निष्ठेने वागायचं असल्यास भाजपसोबत जाण्याशीवाय पर्याय नाही. गेली अनेक वर्षे मी काँग्रेस पक्षासोबत काम करत होतो. त्यावेळी आमची ध्येयधोरणे वेगळी होती. परंतू, निष्टेने काम करण्यासाठी मी भाजप प्रवेश करत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. मी कोणतीही अट न ठेवता म्हणजेच विनाअट भाजपमध्ये आलो असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी सांगितले.

इंदापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला फटका
हर्षवर्धन जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष आणि आघाडीच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही फटका बसणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या भाजप प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या संघर्षाची किनार आहे. हर्षवर्धन जाधव हे यापूर्वी 4 वेळा विधान सभेवर निवडूण गेले आहेत. मात्र, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. त्यामुळे या जागेवर दोन्ही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवले होते. आता विधानसभा निवडणूक 2019 साठी दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरच्या जागेवर दावा सांगत आहे. तसेच, ही जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आहे. इंदापूरच्या जागेवरुन पुन्हा एकदा काँग्रेस नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकसभा निवडणुकीत रंगलेला अहमदनगर पॅटर्न (विखे पाटील) पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांना सहकार क्षेत्र आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.AM News Developed by Kalavati Technologies