सांगलीत पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

सांगली | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीविरोधात आता कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. आज सांगली काँग्रेस तर्फे काँग्रेस भवन समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वाह..रे मोदी तेरा खेल, केंद्र सरकारचा धिक्कार असो, दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे असा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात कॉंग्रेस तर्फे आज राज्यभर आंदोलन केले जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies