कार्तिकीनिमीत्त पंढरपूरच्या महापूजेला येणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना वारकरी सेनेचा विरोध

पंढरपूर येथे कार्तिक एकादशी निमित्त राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महापूजेला येणार आहेत

सोलापूर । उद्या दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे कार्तिक एकादशी निमित्त राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महापूजेला येणार आहेत. दरम्यान राज्यातील शेतकरी वर्ग व बेरोजगारांच्या झोळीत भाजप सरकारने काहीच न टाकल्याने निष्क्रिय सरकारचा निषेध म्हणून पंढरपूरच्या मंदिरात कार्तिक एकादशीच्या महापूजे करिता येणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना येऊ द्यायचे नाही. त्यांना मंदिराच्या बाहेरच रोखणार असल्याचे असा आक्रमक पवित्रा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प अरुण महाराज बुरघाटे पंढरपूर यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितलेAM News Developed by Kalavati Technologies