उद्या कार्तिकी एकादशी, विठ्ठलाची महापूजा करण्यास चंद्रकांत पाटलांना ब्रिगेडचा विरोध

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या होणार आहे.

पंढरपूर | उद्या शुक्रवारी कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास आता संभाजी ब्रिगेडकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी हा विरोध केला आहे.

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या होणार आहे. महसूल मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापुजेला मंगळवारी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्याने विरोध केला होता. या विरोधाचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर आता तातडीने मंदिर समितीचे सदस्य व जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना महापूजा करण्यात विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी चंद्रकांत पाटलांचे आम्ही स्वागत करु असे सांगितले आहे. यानंतर शिवसेनेने आपले आंदोलन मागे घेतले. मात्र आता संभाजी ब्रिगेडने चंद्रकांत पाटलांना विरोध केला आहे. संभाजी ब्रिगडेच्या विरोधामुळे पुन्हा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies