बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रयत्न करणार - प्रणिती शिंदे

बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीस डिसेंबर 2008 मध्ये मंजूरी देण्यात आली आहे

सोलापूर । सोलापूर येथील बोरामणी विमानतळाची आमदार प्रणिती शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचळ, परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते.

बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीस डिसेंबर 2008 मध्ये मंजूरी देण्यात आली आहे. सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी होणार ही गोष्ट सर्वांना सुखावणारी होती. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले. खर तर ही साधी गोष्ट मुळीच नव्हती. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या आणि सर्वच बाजूने महत्वपूर्ण असलेल्या सोलापूरला या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मंजूरीमुळे निश्चितच आणखी मोठे महत्व प्राप्त होणार आहे. जगाच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अत्यंत ठळकपणे सोलापूर समोर येताना खऱ्या अर्थाने सोलापूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार आहे. भविष्याचा विचार करता अशा प्रकारच्या विमानतळाची सोलापूरला गरज होतीच.

सुशिलकुमार शिंदे यांनी पुढिल गरज ओळखूनच यासाठी विशेष प्रयत्न केले. भविष्यात सोलापूरचा चेहरा बदलणारया या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन देखील वेगाने झाले आवश्यक तो मोबदला ही दिला गेला. 550 हेक्टर जमीन देखील संपादित झाली. भूसंपादनाच क्लिष्ट आणि किचकट प्रक्रिया तितक्याच वेगात आणि यशस्वीपणे पार पडली. तब्बल 1375 एक्कर इतकी जमीन या विमानतळासाठी संपादित करण्यात आली.

इतक्या मोठया प्रमाणात भूसंपादन झाल्यानंतर अन् महत्वाची अशी प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढिल कामांनाही वेग येणे गरजेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी बोरामणी विमानतळाच्या विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविलेला होता व प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात 20 कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतू मागील भाजप सरकारमुळे या विमानतळाच्या उभारणीस उदासिनता दाखविली व या विमानतळाचे काम अद्यापपर्यंत रखडलेले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देवून विमानतळाचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies