भाजप आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

काल अचानक लांडगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

पुणे | जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असून अनेकांना कोरोनाची लागण होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा कोरोनाने थैमान घातलं आहे. काल अचानक लांडगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज त्यांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान महेश लांडगे यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची सुद्धा कोरोना तपासणी करण्यात येणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies