कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्याचा पोलिसांवर हल्ला, 9 जणांवर गुन्हा दाखल

पाच संशयितांना अटक

कोल्हापूर । जीवबा नाना पार्क व राजारामपुरी परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात करवीर पोलिस ठाण्यातील हवालदारासह दोन पोलीस जखमी झाले. तर राजारामपुरीतील मध्यवर्ती चौकात शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कॉन्स्टेबलला शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की करण्यात आली. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांपैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे राजारामपुरी परिसरातही मद्यधुंद अवस्थेमधील दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. जनता बाजार चौकात ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केल्याने दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. दरम्यान, कोल्हापुरात पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. टवाळखोरांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशांततेचं वातावरण निर्माण होतंय की काय अशी शक्यताही वर्तवली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies