सोनई पोलिसांची धाडसी कारवाई, गावठी कट्ट्यासह आणखी एक आरोपी ताब्यात

विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अहमदनगर | सोनई पोलिसांनी सलग दुसरी धाडसी कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीस अटक केली आहे. विजय बाळु सोनवणे (रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दि.25/6/2020 रोजी सोनई पोलीस पोलीसांनी घोडेगाव येथे आरोपी निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार( रा.घोडेगांव ता.नेवासा) याला गावठी कट्टयासह अटक करुन गुन्हा दाखल केला होता. 

सदर गुन्हयात आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करुन त्याचेकडे गुन्हयासंदर्भात कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने त्याचा मित्र विजय बाळु सोनवणे (रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे) यास आणखी एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुस विकल्याची कबुली दिली. यावरुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे सपोनि जनार्दन सोनवणे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पुर्व परवानगीने सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ दत्ता गावडे, पोकॉ बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले होते.

या पथकाने पुणे येथे जावुन हडपसर पोलीसांच्या मदतीने गुन्ह्यात आरोपी विजय बाळु सोनवणे याचा शोध घेतला.त्याच्याकडील एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुसे पंचासमक्ष हस्तगत केले आहे. आरोपी विजय बाळु सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणुन अटक करुन त्यास न्यायालयात हजर केले असता 3 जुलै पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत.

आरोपी विजय बाळु सोनवणे याचेवर श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 130/2017 भा.द.वि.क. 302, 364(अ), 34 प्रमाणे, तसेच हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं 1358/2018 भा.द.वि.क. 302/34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम (श्रीरामपुर),शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ दत्ता गावडे, पोना शिवाजी माने, पोकाँ विठठल थोरात, पोकॉ बाबा वाघमोडे व पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies