सातारा-म्हसवडच्या श्री सिध्दनाथ यात्रेच्या तयारीची एक वेगळी परंपरा

घटस्थापना 12 दिवसांची असून या काळात दररोज पूर्ण शहरातुन सवाद्य आरती केली जाते

सातारा | हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माण तालुक्यातील म्हसवड च्या श्री सिध्दनाथ देवाचा यात्रा महोत्सव एक विलक्षण उत्सव असतो. दिवाळी पाडव्यापासून म्हणजे प्रतिपदेला सुरु होणाऱ्या या उत्सवात श्रीचे घट बसवले जातात. घटस्थापना 12 दिवसांची असून या काळात दररोज पूर्ण शहरातुन सवाद्य आरती केली जाते. यावेळी श्री सिध्दनाथ-जोगेश्वरी चा हळदी सोहळा साजरा केला जातो. तर भाऊबीजेच्या दिवशी "दिवाळी मैदान" घेतले जाते.

या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी संपूर्ण शहरातून ग्रामस्थांची नगरप्रदक्षिणा घातली जाते. सुमारे 4 ते 5 हजार महिला पुरुष यामध्ये सहभागी होतात. हे दिवाळी मैदान महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर व म्हसवड या दोनच ठिकाणी पहायला मिळते.तुलसी विवाहाच्या दिवशी श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा रात्री 12 वाजता साजरा केला जातो. त्या नंतर 18 ते 20 दिवसांनी देव दीपावली दिवशी देवाच्या लग्नाची रथातून मोठी मिरवणूक काढली जाते. तो दिवस म्हणजे यात्रेचा मुख्य दिवस असल्याची माहिती देवस्थानचे आजीनाथ गुरव व दत्तात्रय गुरव यांनी दिली.अशी ही वैशिष्ट्य पूर्ण यात्रा असून ब्रिटीश कालीन नगरपालिका असणारी म्हसवड नगरपरिषद व प्रशासन हे यात्रा काळात भक्तांना सर्व सुविधा यशस्वी पणे देत असते.AM News Developed by Kalavati Technologies