मन हेलावून टाकणाऱ्या माळीण दुर्घटनेला आज सहा वर्ष पूर्ण

माळीण दुर्घटनेत 151 जणांसह 900 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांनाही जीव गमावावा लागला होता

पुणे । सहा वर्षापूर्वीच्या त्या मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आजही आठवण काढली की अंगावरती शहारे उभे राहतात. सहा वर्षापुर्वी काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं ते पुणे जिल्ह्यतील माळीण गाव, यामध्ये माळीण हे संपुर्ण गाव डोंगराखाली गाडले गेलं आणि यामध्ये तब्बल 151 मनुष्यांना आपला जीव गमावला लागला तर 900 पेक्षा जास्त मुक्या जणावरांनी ही यात आपला जीव गमावावा लागला होता. आज या दुर्दैवी घटनेला सहा वर्षे पूर्ण झाले असून, आज या माळीण गावात पाचवा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. या आठवणी नातेवाईकांच्या डोळ्यात अजूनही ताज्या आहेत आज सहा वर्षानंतर माळीणकरांना श्रद्धांजली वाहिन्यात आली.

30 जुलै 2014 सहा वर्षापुर्वी याच माळीण गावावर ती पहाट काळाचा डोंगरच ठरली अन काहीच क्षणात होत्याचं नव्हतं झाल, त्याची आजही भीती या माळीण वासियांच्या मनात घर करुन बसली तिच भीती अजूनही दिवसरात्र या लोकांच्या मनात पाहायला मिळते, कारण या घटनेमध्ये घरातील कोणाची आई गेली तर कोणाचे वडील, भाऊ बहीण तर कोणाची मुले या घटनेमध्ये मृत्यू मुखी पडली यांची आठवण मात्र अजूनही येत असल्याचे चित्र पहायला मिळते. आज या माळीण गावात सहावा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न होत असून या आठवणी माळीण करांच्या डोळ्यात अजूनही ताज्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies