'शिवसेना' हे नाव देताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का? उदयनराजेंचा सवाल

ज्यांची लायकी नाही ती बिनपट्ट्याचं माणसं सध्या बोलत आहेत

पुणे | भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा असे म्हणता. मात्र पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा परखड सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.

‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली. यानंतर संजय राऊतांनी छत्रपतींचे वंशज संभाजीराजे भोसलेंना हे मान्य आहे का? असा सवाल केला होता. आता उदयनराजे भोसलेंनी त्यांना सनसणीत उत्तर दिले आहे. उदयनराजे म्हणाले की, 'राज्यात काही झालंतरी ब्लेम गेम होत खेळला जातो. ज्यांची लायकी नाही ती बिनपट्ट्याचं माणसं सध्या बोलत आहेत, अशा लोकांनी आपली लायकी ओळखून राहावे. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा असे म्हणतात. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? तरीही आम्ही कधीच शिवसेना नावार हरकत घेतली नाही. कारण शिवाजी महाराजांचे आम्ही जरी वंशज असलो तरी शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्व देशवासियांना लाभला आहे. शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांची प्रतिमा कुठे लावली आहे असा सवालही त्यांनी यावेळी शिवसेनेला केला?AM News Developed by Kalavati Technologies