उदयनराजे यांना भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही - नवाब मलिक

उदयन राजे हे भाजपामध्ये काही मिळेल या आशेने गेले होते पण त्यांना काही मिळाले नाही

मुंबई ।  भाजपा कार्यालयात गोयल नावाच्या माणसाकडून मोदींची तुला नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करून वाद निर्माण केला गेला. देशभरातून संताप व्यक्त केल्यानंतर ते पुस्तक मागे घेण्यात आले. पण आमची अंतर्गत माहीती आहे की हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही. ज्यांनी पुस्तक लिहीले त्या गोयल यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन आम्ही पुस्तक मागे घेतो असे जाहीर केले पाहीजे, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी म्हटल आहे.

याबरोबरच नवाब मलीक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, उदयन राजे हे भाजपामध्ये काही मिळेल या आशेने गेले होते पण त्यांना काही मिळाले नाही. आता पुढे काही मिळेल म्हणून भाजपा समोर लोटांगण घालत आहेत. तसेच, जाणता राजा असे स्व:ता शरद पवार कधीही स्वताला म्हणत नाही किंवा आम्ही पक्षातर्फे देखील कधीही असे म्हणालो नाही. हे लोकांनी दिलेले नाव आहे, असं नवाब मलिक म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies