देशभरातील टोलनाक्यांवरील टोलवसुलीला स्थगिती, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. भारतामध्येही कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. येत्या 14 एप्रिलपर्यंत अवघा भारत देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

आता लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल वसूली केली जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या 14 एप्रिलपर्यंत भारतात कोणत्याही टोलनाक्यावर टोलवसुली केली जाणार नाही. असे नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies