कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय, राज्य सरकार अपयशी ठरले - गिरीश महाजन

कोरोनाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे - गिरीश महाजन

जामनेर - महाराष्ट्रात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले असून हे रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अशी टीका माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्य सरकारच्या विरोधात जामनेर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवास्थानी महाराष्ट्र बचाव आंदोलन करून तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे मेरा घर मेरा रणांगण आंदोलन आमदार गिरीश महाजन व नगराध्यक्ष साधना महाजन यांनी सहपरिवार त्यांच्या निवासस्थानासमोर राज्य सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवून सरकार विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना हा आजार दिवसेंदिवस वाढत चालला असून याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे.

कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केली जात नसून राज्यातील डॉक्टर पोलिस अधिकाऱ्यांना पीपीइ किट सुरक्षा उपकरणे न दिल्यामुळे आज यांना कोरोना आजाराची लागण लागत असून त्याचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर देशांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना आजाराचे रुग्ण आहे तरी यां सरकारला अजून जाग आलेली नाही त्याला जाग आणण्यासाठी आपण आंदोलन करण असल्याच्या प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी दिल्या आज ठाकरे सरकारचा एकही मंत्री कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर नियोजन करताना दिसत नाही, किंवा घराबाहेर पडत नाही त्यामुळे जनतेला वाऱ्यावर सोडल्यासारखे दिसत आहे. याच्या जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies