मुहूर्त हुकला! राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत एकनाथ खडसेंचं 'नो कॉमेट'

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंनी नो कॉमेट असे उत्तर दिले आहे

जळगाव । भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा अनेक चर्चांना उधान आले होते. समर्थकांनी त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत तारीख सुद्धा जाहीर केली होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सध्या तरी पुर्णविराम मिळाला आहे. शुक्रवारी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत 'नो कॉमेट' असे म्हटले आहे. मला याबाबत काहीही चर्चा करायची नाही. राष्ट्रवादीत जाण्याचा मुहूर्त तुम्हीच अर्थात माध्यमांनीच ठरवला होता. असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी खडसेंच्या राष्ट्रवादीबाबत विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार मला काही जण भेटले. भेट झाली म्हणजे काही काळेबेरे समजू नये. तसेच खडसेंच्या प्रवेशाबाबत मला काहीही माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies