'हे सरकार म्हणजे अली बाबा चाळीस चोरांची टोळी', राज्य सरकारवर बोचरी टीका

उद्या भाजपच्या वतीनं घरासमोर आंदोलन करण्याचं आवाहन

जालना - राज्य सरकार म्हणजे अली बाबाची चाळीस चोरांची टोळी असल्याची बोचरी टीका भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलीये. कोरोनामुळं संपूर्ण जग भयभीत झालं असून राज्यातही त्याचा हाहाकार झालाय. राज्यभरात चाळीस हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झालीये. ग्राऊंड लेवलला सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचं लोणीकर यांनी म्हंटलंय.

सरकार नावाची चिज दिसत नसून आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खात, हे सरकार म्हणजे अली बाबाची चाळीस चोरांची टोळी असल्याचं म्हणत लोणीकर यांनी सरकारवर बोचरी टीका केलीये. त्याचबरोबर कोरोनावर राज्य सरकार कुंभकर्णासारखं झोपलेलं असून सरकारनं याकडे लक्ष दिलं नाही तर परिस्थिती ही गंभीर होईल. आणि महाराष्ट्रात हाहाकार माजेल आणि लोक रस्त्यावर उतरतील. असा इशारा देत उद्या भाजपच्या वतीनं आंदोलनाचं आवाहनही लोणीकर यांनी केलंय.AM News Developed by Kalavati Technologies