शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही - उद्धव ठाकरे

मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली - उद्धव ठाकरे

मुंबई । मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे की, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला दाखवीन आणि ते वचन मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा त्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषद अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चाच झाली नसल्याचा आरोप केला. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मी शब्द देताना काळजीपूर्वक देतो ही बाळासाहेबांची शिकवण आहे. पण, पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांवर खोटे बोलण्याचा आरोप झाला आहे. अमित शहा यांनी अडीच वर्ष सत्ता मान्य केली होती असे सांगितले.   राज्यातला सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना फोन केले, पण त्यांनी फोन उचलले नसल्याची खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. माझ्यावर खोटारटेपणाचे आरोप झाल्यामुळे दु:खी आहे. देवेंद्र अमित शाह यांचा आधार घेऊन खोटेपणाचा आरोप केलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies