पंतप्रधान मोदींनी दिली होती ऑफर, शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यानंतर दिल्लीत मोदी पवार भेटीत राज्याच्या राजकारणावर खलबतं झाल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे

मुंबई । राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सोबत काम करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा शरद पवार यांनी केला आहे. तसेच आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्याविषयी देखील मोदी आपल्याला बोलले होते, असं पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी केलेल्या या दाव्यानंतर दिल्लीत मोदी पवार भेटीत राज्याच्या राजकारणावर खलबतं झाल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे.

राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेटली होती. या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याच भेटीत मोदींनी आपल्याला भाजपासोबत येण्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केल्याने राज्याच्या राजकाणात खळबळ उडाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies