PM Modi । कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधानांचे आज सहाव्यांदा देशाला संबोधन

जाणून घ्या कोरोना काळात आजपर्यंतच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. देशातील कोविड रुग्णांच्या केसेस वाढणारा वेग आणि सीमेवर चीनसोबत सुरू असलेला तणाव यादरम्यान आजच्या संबोधनाकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. जेव्हापासून देशात कोरोना विषाणूचे संकट उद्भवले आहे, तेव्हापासून पंतप्रधानांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी देशाला संबोधित केले. आज त्यांचे हे सहावे संबोधन असेल. तत्पूर्वी, जनता कर्फ्यूच्या घोषणेपासून ते 20 लाख कोटींच्या पॅकेजपर्यंत अनेक निर्णय पंतप्रधानांनी घेतलेले आहेत.

यापूर्वीच्या संबोधनांतील महत्त्वाचे मुद्दे

पहिले संबोधन 19 मार्च
या दिवशी कोरोना महामारीवर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले.

दुसरे संबोधन 24 मार्च
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. 25 मार्चपासून सुरू झालेला पहिला लॉकडाऊन 21 दिवस ठेवण्यात आला. गेली.

तिसरे संबोधन 3 एप्रिल
या दिवशी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी जनतेला कोविड योद्ध्यांच्या सन्मानासाठी दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. देशातील कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ संपूर्ण देशभरात रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दीप प्रज्वलन करण्यात आले.

चौथे संबोधन 14 एप्रिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात लॉकडाऊन २.० ची घोषणा केली. हे लॉकडाऊन 3 मेपर्यंत सुरू राहिले. यानंतरचे सर्व लॉकडाऊन गृहमंत्रालयातर्फे लावण्यात आले.

पाचवे संबोधन 12 मे
पंतप्रधानांनी 12 मे रोजी अखेरचे संबोधन केले होते. या दिवशी त्यांनी ऐतिहासिक 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याअंतर्गत छोटे व्यापारी, कामगार, गरिबांना आर्थिक मदत, कर्जाची मदत जाहीर करण्यात आली.

आज 30 जून सहावे संबोधन
आज संध्याकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आपण सांगू की, देशात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि ही संख्या जवळपास 6 लाखांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, सोमवारी सरकारने अनलॉक 2.0 बद्दलची माहिती शेअर केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies