परभणी | संकटकाळी आंदोलन करणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादीकडून निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी आंदोलन

परभणी | राज्यात सध्या कोरोनाचे संकट वाढत असताना प्रत्येकाने एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. अशा संकटाच्या वेळी आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस काळे फासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली.

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वाढले आहे. अशा वेळी समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. अशा नाजूक प्रसंगी भाजपाचे नेते सत्तेचं राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आघाडी सरकारला विरोध करत आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारचा जो निषेध केलाय त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. महाराष्ट्रद्रोही भाजपाच्या या कृतीचा निषेध म्हणून भाजपच्या या दोन नेत्यांच्या फोटोला काळे लावून घोषणाबाजी करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, महिला अध्यक्ष नंदाताई राठोड, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, किरण तळेकर, संदीप माटेगावकर, सुमंत वाघ, राजू शेलार आदी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies