नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता धोक्यात

महापौर जयवंत सुतार यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला

नवी मुंबई । नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, माजी खासदार संजय नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई पालिकेतील सत्ता धोक्यात आली आहे. गणेश नाईक नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या तयारीत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांचे पूत्र संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता जिल्ह्यातील नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह गणेश नाईक लवकरच प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. मात्र अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता धोक्यात आली आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies