मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्यानंतरही 'आरे'मध्ये काम सुरूच?

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनकडून केराची टोपली

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनकडून केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. आरेतील या परिसरात दिवसरात्र खणण्याचे काम सुरूच असल्याचे वृत्त आहे. प्रजापूर पाडा येथे रॅम्प बनवण्याच्या कामाने दिवसा आणि रात्रीही वेग घेतला आहे. सातत्याने जमिनीच्या पोटात यंत्र शिरण्याचा आवाज येत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे.

या कामामुळे आजुबाजूच्या घरांना हादरे बसत असल्याचेही सांगण्यात येत आहे. कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर कारशेडमध्ये जाण्यासाठी रॅम्पचे काम नेमके कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies