महाविकास आघाडी सरकार आरोग्य सेवेत अपयशी ठरले - हर्षवर्धन पाटील

ठाकरे सरकारला इंदापूरात दाखवल्या गावोगावी काळ्या फिती

इंदापूर | कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यात राज्य अपयशी ठरत असल्याने भाजपच्या वतीने संपुर्ण राज्यात आज महाविकास आघाडी सरकारचा विरूद्ध काळे झेंडे व फलक दाखवून निषेध नोंदवण्यात येतोय. इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांसह तालुक्यात गावोगावी भाजप समर्थकांनी निषेध नोंदवलाय. गेल्या दोन महीन्यात महाविकास आघाडी सरकार हे आरोग्य व्यवस्थेत अपयशी ठरले असून केंद्राच्या मदतीव्यतीरिक्त राज्य सरकारने कोणतीही मदत अद्याप जाहीर केली नाही. अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

तर काही ठिकाणी शेतक-यांनी आपल्या मेंढ्या व जनावरांच्या गळ्यात सरकारच्या नाकर्तेपणाची पाटी बांधून आमची सोय काय? असा थेट सवाल ठाकरे सरकारला केला आहे. इंदापूर मध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कोरोना महामारी नियोजनात अपयशी ठरत असल्याची टीका भाजपा शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद यांनी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies