मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे न मांडल्याने, महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला - आमदार बबनराव लोणीकर

तात्काळ अध्यादेश काढून मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात व नोकरीत सुरक्षा प्रदान करावी, मराठा विद्यार्थ्यांची शैक्षणिक-आर्थिक जबाबदारी सरकारने सांभाळावी - लोणीकर यांची मागणी

जालना । तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला 16 टक्के एसबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले होते. त्याबाबत मानणीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तात्कालीन महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड पाठपुराव्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय देऊन मराठ्यांना आरक्षण घोषित केले होते. परंतु काही दळभद्री लोकांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या विरोधात कट कारस्थान करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्याठिकाणी मराठा समाजाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली

मराठा आरक्षणाच्या प्रगतीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून आरक्षणाच्या आधारावर नोकरी मिळालेल्या युवकांची नोकरी धोक्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आरक्षणावर आधारित प्रवेश प्रक्रियेमधून मराठा समाज वंचित राहणार आहे. त्यासाठी अध्यादेश काढून मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणामध्ये सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.

मागील सरकारच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत प्रयत्न केला होता. परंतु तांत्रिक दृष्ट्या पूर्ण करता आली नाही. म्हणून एसटी प्रवर्गाला दिल्या जाणाऱ्या बहुतांश 22 सवलती धनगर समाजाला देण्यात याव्यात अशा प्रकारची व्यवस्था केली होती. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने देखील खास बाब म्हणून मराठा समाजाला आरक्षणाबाबत सुरक्षा प्रदान करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी देखील लोणीकर यांनी यावेळी केली

महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून माननीय उच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांनी टिकवलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात मात्र पाठ पुराव्याअभावी स्थगित झाले. ही बाब प्रचंड निंदनीय असून मराठा समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यासाठी अध्यादेश काढून मराठा आरक्षणाला सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies