सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांची ठाकरे सरकार चलेजावची घोषणाबाजी

सांगलीत भाजपाकडून मेरा अंगण मेरा आंदोलन

सांगली : सांगलीत आज भाजपाच्या आमदार आणि कार्यकर्ते नगरसेवकांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ मेरा अंगण मेरा आंदोलन केले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार चलेजावची घोषणाबाजीही केली.

सांगलीत भाजपाकडून वेगवेगळ्या ठिकाणी मेरा अंगण मेरा आंदोलन करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या कार्यालयाबाहेर तर भाजपा नगरसेवकांनी गावभागात आंदोलन करीत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार चलेजावच्या घोषणा देत काळे झेंडे फडकवले. सोशल डिस्टन्स पाळत हे आंदोलन करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies