डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला आहे.

मुंबई | कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापी सहन केल्या जाणार नाहीत. असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल. वसई, बीड,मालेगावसारख्या ठिकाणी अशा घटना समोर आल्यात. यामुळे या लढ्याला धक्का बसत आहे.

संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होत असलेली गर्दी चिंताजनक आहे. जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचना दिल्यात. वाई, बारामती शहरांत अशी व्यवस्था केली आहे. असेही अजित पवार म्हणाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies