वादग्रस्त वक्तव्य भोवलं ! भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादी वरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात 502/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी काल पंढरपूर येथे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या ह्या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.

त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली होती.  बारामती शहर पोलीस ठाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादी वरुन बारामती शहर पोलीस ठाण्यात 502/ 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पडळकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलने करत आहे.AM News Developed by Kalavati Technologies