गोरेगावमधील तरुणाने 46,080 कवड्यांचा वापर करुन साकारलं देवीचं रुप

समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या कवडीला एक प्रकारे लक्ष्मीचेच रूप मानले जाते.

मुंबई | 46,080 'श्रीलक्ष्मी कवड्यांचा' वापर करून मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे बाळकृष्ण गायकवाड या युवकाने नवरंगाने देवीचं रूप साकारलं आहे. यामधून त्याने देवीचं सगुण रूप साकारले आहे. एकीकडे कुठेतरी लोप पावत चाललेल्या कवड्या, त्याला असणारं अध्यात्मिक महत्व, देवीच्या शृंगारात होणारा कवड्यांच्या वापर, कवड्यांची संस्कृती यांचे लोकांना स्मरण व्हावे, शिवाय आजकाल जे समुद्रातील प्रदूषण वाढतेय ज्यामुळे अनेक समुद्री संपत्तीचा ऱ्हास होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अमित बाळकृष्ण गायकवाड याने कवड्यांपासून देवीचं रूप सकारलं आहे.

समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या कवडीला एक प्रकारे लक्ष्मीचेच रूप मानले जाते. प्राचीन काळी कवड्यांचाच वापर चलन म्हणून ही होत असे. देवीदेवता किंवा पुराणकाळात सारीपाट खेळताना कवड्यांचाच वापर दान टाकण्यासाठी करत असत. त्याबाबतीत अनेक आख्यायिका ही प्रचलित आहेत. आई भवानीचे भक्तही देवीला प्रिय असणाऱ्या या कवड्यांच्याच माळा परिधान करून जोगवा मागतात. गोंधळी, वासुदेव ही कवड्यांचेच दागिने, मुकुट परिधान करून देवाची आळवणी करतात. कालांतराने कवडीचं महत्व कमी झालं तसं लोकं, 'कवडीमोल झालं', 'कवडीची किंमत नाही' अशाप्रकारच्या म्हणीही बोलू लागले. पण कवडीची किंमत ही श्रेष्ठच होती आणि आहे. खुद्द भोसले घराण्यातील सर्व वीर पुरुष कवड्यांची माळ धारण करायचे का तर, त्यांनी आपलं अवघं आयुष्य कवडीमोलाचं समजून ते स्वराज्यासाठी वाहिलं होती. गोरेगावातील बाळकृष्ण गायकवाड या तरुणाने याच कवड्यांचा वापर करुन देवीचे रुप साकारले आहे.AM News Developed by Kalavati Technologies