मुख्यमंत्री ठाकरे वर्षावर रहायला जाणार की मातोश्रीवरून हलविणार सत्तेची सूत्रे ?

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच घर म्हणून तर प्रेम आहेच. पण या बंगल्यात बाळासाहेबांचं वास्तव्य होते

मुंबई । उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. आणि शासनाकडून परंपरेनुसार मुख्यमंत्री यांना वर्षा बंगला देण्यात आला आहे. पण नवे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यातुन राज्याचा कारभार पाहणार, का? मातोश्रीवरूनच सत्ता सुत्र हलवणार याची खमंग चर्चा रंगू लागलीय.

महाराष्ट्राच्या परंपरेनुसार राज्याचे मुख्यमंत्री हे वर्षा बंगल्यावर राहायला जात असतात. आता पर्यंत राज्याला लाभलेले मुख्यमंत्री या बंगल्यातुन राज्याचा कारभार करतात. तर सत्तेत असो किंव्हा नसो, पण राज्याच्या राजकारणच केंद्र बिंदू असलेला बंगला म्हणजे मातोश्री. बाळासाहेब ठाजरे यांनी अनेकवेळा सत्तेची गणित या बांगळ्यातून फिरवली आहेत. तसेच शिवसेनेची आज जी काही भरभराट झाली आहे आहे. त्या भरभराटीची साक्षीदार म्हणून ही वास्तू राहिली आहे. मात्र आता उद्धव ठाजरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाजरे हे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार का मातोश्रीवरूनच सत्तेची सूत्र फिरवणार? याची चर्चा रंगली आहे.


मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच घर म्हणून तर प्रेम आहेच. पण या बंगल्यात बाळासाहेबांचं वास्तव्य होते. अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांनी याच घरातून अगदी जवळून पाहिल्या आहेत. अगदी शिवसेनचा पडता काळही त्यांनी याच घरातून पाहिला, तर शिवसेनेची भरभराट देखील पाहिली, म्हणून त्यांची मातोश्रीवर नितांत श्रद्धा आहे.

मुंबईत आधी बाळासाहेब ठाकरे हे माहीमच्या एका चाळीत राहत होते. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी दादर मधील कदम मेंशन इथे घर घेतलं. याच घरात शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व फुलत असताना दादरच्या कदम मेंशनमधून बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर राहण्याससाठी आले. तेव्हा पासून आज पर्यंत हे घेर महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाचं केंद्र बिंदू ठरलं आहे, आणि याचे साक्षीदार होते उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री 2 ही इमारत ही तयार केली आहे. या इमारतीत ठाकरे कुटुंबीय लवकरच राहायला जाणार आहे. पण आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे या मातोश्री 2 मध्ये सध्यातरी ठाकरे कुटुंबीय जाणार नाहीत हे स्पष्ट झालय. म्हणूनच उद्धव ठाकरे हे आता वर्षा बंगल्यावर राहायला जाणार, का मातोश्रीवरूनच राज्याचा गाडा हाकणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.AM News Developed by Kalavati Technologies