'गावबंदी केल्यास कारवाईचा इशारा, गावचे रस्ते मोकळे करा'

गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना गावाचे रस्ते मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

रायगड | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. असं जरी असलं तरी रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थानी गावाच्या वेशीवर कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला आहे. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत आहेत. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नाही. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. अशावेळी गावबंदी करणाऱयांवर कारवाईचा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिलाय. गावचे सरपंच, पोलीस पाटील यांना गावाचे रस्ते मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies