नवाब मलिकांच्या भावाची मग्रूरी, कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ महिन्याभरपूर्वीचा असल्याचे स्पष्टीकरण कप्तान मलिक यांनी दिले आहे.

मुंबई ।  राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कप्तान मलिक रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना ‘वर्क ऑर्डर कुठं आहे?’ असा प्रश्न विचारत मारहाण करत आहेत. या त्यांनी या कामगारांना मारहाण केलीये तसंच शिवगाळ करत पुन्हा दिसले तर हातपाय तोडून टाकेन अशी धमकीही दिलीये.

या व्हिडीओमध्ये अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या देताना देखील कप्तान मलिक दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे ज्या तरुणांना मारत आहेत, त्या तरुणांना माझ्यावर केस करा, पोलिसात तक्रार करा असंही मोठमोठ्यानं सांगतान दिसत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ महिन्याभरपूर्वीचा असल्याचे स्पष्टीकरण कप्तान मलिक यांनी दिले आहे. याप्रकरणी अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies