आज सोने प्रति तोळा 1730 रुपयांनी स्वस्त; लवकरच जाणार 50 हजारांवर, गोल्ड कौन्सिलचा अंदाज

घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमला 38,154 रुपये झाली आहे.

मुंबई । सध्या सोन्याचे दर 40 हजार रुपयांचा आत आहेत. असे असूनही ग्राहकांच्या खरेदीमध्ये घट झालेली नाही. यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याचे दर तब्बल 50 हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत गोल्ड कौन्सिलने सोन्याच्या वाढत्या दराबाबत अंदाज व्यक्त केला आहे. सोन्याची किंमत बुधवारी 0.26 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या आठवड्यात सोनं 39,278 रूपयांवर गेलं होतं. बुधवारी प्रति दहा ग्रॅमला 1730 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमला 38,154 रुपये झाली आहे. रुपयाला मिळालेलं बळ आणि मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे म्हटले जात आहे.

सोन्याप्रमाणे चांदीचे दरही कमालीचे घसरलेत. चांदीच्या किमतीत 0.23 टक्क्यांनी घसरण झाली आहे. चांदीच्या दरांत प्रतिकिलो 3800 रुपयांनी घट झाली आहे. बुधवारी चांदीची किंमत प्रतिकिलो 47,686 रुपये आहे. गेल्या आठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो 51,489 रुपये होती.

तथापि, लवकरच प्रति औंस सोन्याचा दर 2 हजार डॉलर्सवर पोहोचणार आहे, सध्या 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळजवळ 39 ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान ग्राहकांना पैसे मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच सोन्याचे दर प्रति ग्रॅम 3 हजार 827 रुपये आहेत. मात्र, हे दर प्रति 2 औंस हजार झाल्यास सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ होणार आहे. देशात सध्या आर्थिक मंदीची स्थिती आहे. तरीही लोक सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. तसेच सोन्यात केलेली गुंतवणूक ही गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय वाटत आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सोन्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. याचा परिणाम म्हणून नजीकच्या काळात भाववाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies